ती ची गोष्ट ऑफिसमध्ये साधारण ११ च्या सुमाराला फोन वाजला . बघितलं तर क्लिंनिंग लेडीचा फोन . संध्याकाळी घरी गेल्यावर छान आवरलेले , स्वच्छ घर बघायची स्वप्न बघत होते तर क्लिंनिंग लेडी आज जमणार नाही असे फोन वर सांगत होती. कुठल्यातरी मैत्रिणीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे होते म्हणून येऊ शकणार नाही असे सांगत होती. नेहमी प्रमाणे आज नवीन काहीतरी स्टोरी असणार होती. नेक्स्ट वीक मध्ये नक्की यायचे प्रॉमिस करून तिनी फोन ठेवला. नेक्स्ट वीकमध्ये कामाला आल्यावर क्लिनींग लडी ने सांगायला सुरतवात केली त्या ती ची कहाणी . ती ३ मुलांची आई , त्यातील एक जरा स्पेशल कीड. ती कुठेतरी स्वताच्या दिसण्याबद्दल , स्वताच्या शरीराबद्दल साशंक . नवरा दुसरीकडे कुठेतरी गुंतलाय आणी आपण आता त्यासाठी फारसे aatractive नाही राहीलो असे मनात कुठेतरी जाणवून एक चुकीचा निर्णय घेतला.... गेली टर्की ला ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करायला . आपल्या शरीराच्या वाढलेल्या आकार उकारांमुळे नवरा परत आपल्याकडे ओढला जाईल अश्या खुळ्या कल्पनेमुळं ब्रेस्ट इम्प्...
Posts
जर्मनीतले लॉकडाऊनचे अनुभव
- Get link
- X
- Other Apps
जर्मनीतले लॉकडाऊनचे अनुभव २०२० साल एकदमच हॅपानिंग सुरु झाले. साधारण मार्च पासून जर्मनी मध्ये लॉकडाऊन सुरु झाले. प्रथम हे सगळे फक्त चायना मध्येच आहे ...आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही अश्या भ्रमात होतो पण लवकरच प्रॉब्लेम चा आवाका लक्षात आला. रोज नवीन रुल्स ,रोज नवीन वाढणारे आजारी लोकांचे आकडे यामुळे थोडे थोडे टेंन्शन वाढत होते. त्यातच रोज आता घरून काम करायची ऑर्डर कंपनी कडून आली , जिम बंद झाली . एका वेळी दोन च लोक एकत्र बाहेर जाऊ शकत होते. अश्या सगळ्या बदलांबरोबर सवय करून घ्यायला जरा वेळ लागला पण लवकरच या सगळ्याला मी सरावले आणि आता यातून काय मार्ग काढता येईल याचा विचार करू लागले. नशीबाने जर्मनीत लॉकडाऊन फार स्ट्रीक्ट नसल्यामुळे बाहेर जाऊ शकत होतो. इतर काही देशांसारखी वाईट परीस्थीती नसल्यामुळे हा लॉकडाऊन तसा सुसह्य होता. प्रथम मी जिम बंद असल्यामुळे व्यायामाचा विचार केला. मग दररोज १० किलोमीटर तरी चालायचे असे ठरवले. आणि त्याप्रमाणे एक वॊक दुपारी जेवण झाल्यावर आणि एक वॊक संध्याकाळी ऑफिस संपल्यावर . असे करून रोजचे व्यायामाचे रुटीन जमवले. कधी एकटी तरी कधी संध...
पश्चाताप
- Get link
- X
- Other Apps
रात्रीचे १२ वाजून होते . मिगेल घराच्या खिडकीतून बाहेर बघत होता . विचार करून करून तो खूपच थकला होता . रस्त्यावर आजूबाजूच्या घरातील काही तरुण मुले गप्पा मारत बसली होती . उकाडा पण खूपच जाणवत होता . मिगेल च्या हातात आता फक्त २ दिवस होते . २ दिवसांनी त्याला फायनल निर्णय घ्यायचा होता . त्याने हो ठरवलं तर त्याला इंग्लडला जायला मिळणार होत . एका मुक्त विचाराच्या , मोकळ्या वातावरणाच्या देशात जाऊन मोकळा श्वास घेता येणार होता . त्याच्या देशातील इतर अनेकांप्रमाणे त्याचेही लवकरात लवकर संधी घेऊन देश सोडून जाण्याचे स्वप्न होते . मिगेल च्या साम्यवादी देशात जीवन जगणे अवघड होते . मुक्त विचार करणे शक्य नव्हते . सगळ्या गोष्टींचा सतत तुटवडा असणे , कामाचा योग्य मोबदला नाही . कितीही काम केले , कितीही शिकले तरी पगार सगळ्यांना सारखाच . सगळे काही सरकारच्या हातात . मिगेल खरंतर पेशाने शिक्षक होता . गणित आणि भाषेवर त्याचे प्रभुत्व होते . ३ वर्ष शिक्षकाची अपुऱ...