Monday, March 8, 2021

ती ची गोष्ट

ऑफिसमध्ये साधारण ११ च्या सुमाराला फोन वाजला . बघितलं तर क्लिंनिंग लेडीचा फोन . संध्याकाळी घरी गेल्यावर छान आवरलेले , स्वच्छ घर  बघायची स्वप्न बघत होते तर क्लिंनिंग लेडी आज जमणार नाही असे फोन वर सांगत होती. कुठल्यातरी मैत्रिणीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे होते म्हणून येऊ शकणार नाही असे सांगत होती. नेहमी प्रमाणे आज नवीन काहीतरी स्टोरी असणार होती.  नेक्स्ट वीक मध्ये नक्की यायचे प्रॉमिस करून तिनी फोन ठेवला. 

नेक्स्ट वीकमध्ये कामाला आल्यावर क्लिनींग लडी ने  सांगायला सुरतवात केली  त्या ती ची कहाणी . 

ती ३ मुलांची आई , त्यातील एक जरा स्पेशल कीड. ती कुठेतरी स्वताच्या  दिसण्याबद्दल , स्वताच्या शरीराबद्दल साशंक . नवरा दुसरीकडे कुठेतरी  गुंतलाय आणी आपण आता त्यासाठी फारसे  aatractive नाही राहीलो असे मनात कुठेतरी जाणवून   एक चुकीचा निर्णय घेतला.... गेली टर्की ला ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करायला .  आपल्या शरीराच्या वाढलेल्या आकार उकारांमुळे नवरा परत आपल्याकडे ओढला जाईल अश्या खुळ्या  कल्पनेमुळं ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी चा निर्णय घेतला. जर्मनी पेक्षा टर्की मध्ये स्वतात होते म्हणून तिकडे गेली पण सर्जरी चुकली . अर्थातच तेव्हा नाही कळलं. पण  जर्मनीत आल्यावर लागेचच हेवी ब्लीडींग आणि इतर काही प्रॉब्लेम सुरु झाले  आणि हॉस्पिटल मध्ये भरती व्हावे लागले. अर्थातच इकडल्या  डॉक्टारांनीं हात झटकले. टर्कीच्या डॉक्टारांचा दोष आहे सांगितलं. इम्प्लांट केलेले सिलिकॉन ब्रेस्ट बाहेर काढावे लागले , नवीन इन्फेक्शन झाले. पब्लिक इन्शुरन्स  मुळे फार महागाची ट्रीटमेंट करता येत नव्हती.  आधीच ४००० युरो  घालवून झाले होते आता परत पुढच्या ट्रीटमेंट साठी ३-४००० युरो द्यावे लागले. आणि एवढं करूनही फारसे काही हाती लागले नाही.  अनेक वेळा हॉस्पिटलच्या emergency मध्ये वाऱ्या करून शेवटी ब्रेस्ट कॅन्सर च शेवटच्या स्टेज च निदान झाले आणि एक आयुष्य संपले.  फक्त एका कुठल्यातरी स्वतःच्या शरीराबद्दलच्या अवास्तव  अपेक्ष्या , आत्मविश्वासाचा अभाव , कोणालातरी आपण फक्त आपल्या शरीरामुळे आवडू शकू बाकी कश्यामुळे नाही असा  समज  यामुळं  सगळंच अकाली संपलं.

महिला दिना च्या निमीत्यानी तरी जरा विचार करा, स्वतःच्या  हेल्थ बद्दल, शरीराबद्दल जागरूक रहा. महिला म्हणजे फक्त जाहिरातीत दाखवलं जाणारे सुंदर शरीर बाकी काही नाही , आपण फक्त आपल्या शरीरामुळं आकर्षक दिसू शकतो, फक्त सुडोल शरीरामुळं आवडू शकतो हा समाज आपल्या मनातून काढून टाका आणी आत्मविश्वासानी पाऊल पुढे टाका.

 

अनघा दातार