ती ची गोष्ट ऑफिसमध्ये साधारण ११ च्या सुमाराला फोन वाजला . बघितलं तर क्लिंनिंग लेडीचा फोन . संध्याकाळी घरी गेल्यावर छान आवरलेले , स्वच्छ घर बघायची स्वप्न बघत होते तर क्लिंनिंग लेडी आज जमणार नाही असे फोन वर सांगत होती. कुठल्यातरी मैत्रिणीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे होते म्हणून येऊ शकणार नाही असे सांगत होती. नेहमी प्रमाणे आज नवीन काहीतरी स्टोरी असणार होती. नेक्स्ट वीक मध्ये नक्की यायचे प्रॉमिस करून तिनी फोन ठेवला. नेक्स्ट वीकमध्ये कामाला आल्यावर क्लिनींग लडी ने सांगायला सुरतवात केली त्या ती ची कहाणी . ती ३ मुलांची आई , त्यातील एक जरा स्पेशल कीड. ती कुठेतरी स्वताच्या दिसण्याबद्दल , स्वताच्या शरीराबद्दल साशंक . नवरा दुसरीकडे कुठेतरी गुंतलाय आणी आपण आता त्यासाठी फारसे aatractive नाही राहीलो असे मनात कुठेतरी जाणवून एक चुकीचा निर्णय घेतला.... गेली टर्की ला ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करायला . आपल्या शरीराच्या वाढलेल्या आकार उकारांमुळे नवरा परत आपल्याकडे ओढला जाईल अश्या खुळ्या कल्पनेमुळं ब्रेस्ट इम्प्...
Posts
Showing posts from March, 2021