Friday, August 14, 2020

पश्चाताप

 

  रात्रीचे १२ वाजून  होते. मिगेल घराच्या खिडकीतून बाहेर बघत होता. विचार करून करून तो खूपच थकला होता. रस्त्यावर आजूबाजूच्या घरातील काही तरुण मुले गप्पा मारत बसली होती. उकाडा पण खूपच जाणवत होता.

  मिगेल च्या हातात आता फक्त दिवस होते. दिवसांनी त्याला फायनल निर्णय घ्यायचा होता.  त्याने हो ठरवलं तर त्याला इंग्लडला जायला मिळणार होत. एका मुक्त विचाराच्या , मोकळ्या वातावरणाच्या देशात जाऊन मोकळा श्वास घेता येणार होता. त्याच्या देशातील इतर अनेकांप्रमाणे त्याचेही लवकरात लवकर संधी घेऊन देश सोडून जाण्याचे स्वप्न होते.

मिगेल च्या साम्यवादी देशात जीवन जगणे अवघड होते. मुक्त विचार करणे शक्य नव्हते. सगळ्या गोष्टींचा सतत तुटवडा असणे, कामाचा योग्य मोबदला नाही. कितीही काम केले, कितीही शिकले तरी पगार सगळ्यांना सारखाच . सगळे काही सरकारच्या हातात . मिगेल खरंतर पेशाने शिक्षक होता. गणित आणि भाषेवर त्याचे  प्रभुत्व होते. वर्ष शिक्षकाची अपुऱ्या पगारावर नोकरी केल्यावर त्याने आता इतर बऱ्याच लोकांप्रमाणे टुरिस्ट गाईडच्या कामाला सुरवात केली होती. सध्याचा घडीला हाच एक व्यवसाय बहरत होता. सध्या तरी सरकाची धोरणे या व्यवसायाला अनुकूल होती आणि म्हणूनच या कामात इतर कामापेक्षा थोडातरी मोबदला जास्त मिळत होता.

  विचार करता करता मिगेलच्या डोळ्यासमोर जेनीचा चेहरा आला. जेनी ....त्याची गर्लफ्रेंड . जेनी खरतर लंडन च्या एका मोठ्या  फर्म मध्ये फायनान्स अनॅलिस्ट म्हणून काम करत होती. पण कधीतरी या कामाच्या प्रेशरला  ,पॉलिटिक्स ला कंटाळून महिन्यांची सुट्टी घेऊन जग फिरायला , स्वतःला रिफ्रेश करायला बाहेर पडली. फिरत फिरत मिगेलच्या देशात आली. त्याची आणि तिची तिच्या पहिल्या टूर मध्ये तिचा गाईड म्हणून ओळख झाली. आणि नंतर तिने जेव्हा पुढचे महिने इकडेच राहायचे ठरवले तेव्हा मीगेलनेच तिला सगळी मदत केली. जागा शोधणे , तिला नवीन नवीन ठिकाणांची माहिती देणे ,कधी कुठे घेऊन जाणे असं करता करता दोघे एकमेकात कधी गुंतले  त्यांना पण कळले नाही. मिगेल  जेनीला बर्याचवेळेला त्याचे देश सोडून जाण्याचे , मोकळ्या हवेत श्वास घेण्याचे स्वप्न   बोलून दाखवत असे. त्याच्या देशातील रोजच्या जगण्याच्या लढाईचा आता त्याला कंटाळा आला होता.

जेनीच्या सुट्टीचे आता थोडेच दिवस उरले होते आणि जेनीने त्याच्या समोर एक प्रस्ताव ठेवला . तिने त्याला तिच्याबरोबर लंडन यायचा प्रस्ताव ठेवला. त्यासाठी अर्थातच ती सगळी मदत करणार होती.

  मिगेल ला  अर्थातच खूप आनंद झाला. जेनी त्याचे स्वप्न पूर्ण करणार होती. पण त्याच क्षणी त्याच्या डोक्यात त्याच्या आजोबांचा विचार आला. आजोबा आता खूपच थकले होते. त्यांची सगळी जबाबदारी मिगेल वरच होती. त्यांना मिगेलशिवाय कोणीच नव्हते . मिगेल १२ दिवसांचा असताना त्याची आई त्याला आजोबांकडे सोडून एका नव्या आयुष्याच्या शोधात निघून गेली. आणि वडलांनी तर कधीच तोंड दाखवले नाही. आजोबांनीच त्याची जबाबदारी घेतली आणि त्याला खूप मायेने वाढवले. त्याचे सगळे हट्ट पुरवले. आता त्याच्या म्हातारपणी त्यांना सांभाळणे मिगेल ची जबाबदारी होती. लहानपणापासून जेव्हा जेव्हा मिगेल अस्वस्थ असेल, डोक्यात विचारांचे काहूर माजलेले असेल, निर्णय घेता येत नसेल तेव्हा मिगेल आजोबांकडे यायचा. ते  अतिशय खुबीने , शांतपणे समजवून देऊन त्याचा मनातला गुंता सोडवायचे. गेल्या काही दिवसांपासून मिगेल अस्वस्थ होता. आजोबांच्या नजरेतून हि गोष्ट सुटली नव्हती. पण मिगेल ने प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून बोलणे टाळले .

  हि गोष्ट तो आजोबांना सांगूच शकत नव्हता आणि त्यांना सांगता , त्यांना एकटं  टाकून जाऊ ही  शकत नव्हता. आज पहिल्यांदाच त्याच्या मनात ही आजोबांची ब्याद आपल्यामागे नसती तर बरे झाले असते , आजोबा नसते तर आपण मुक्तपणे आपल्याला हवे ते करु शकलो असतो असा  अतिशय स्वार्थी  विचार आला. त्यांना सांगता गुपचूप जेनी बरोबर निघून जाऊ असं ही त्याच्या मनात एकदा आले. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या या विचारांची त्याला लाज वाटली. आपल्या स्वार्थासाठी आपण इतका वाईट विचार करू शकतो , इतक्या खालच्या पातळीवर जाऊ  शकतो याची त्याला खरंच शरम वाटली . आजोबा नसते तर ...असा वाईट विचार मनात तरी कसा येऊ शकतो .  ज्या आजोबांनी सगळं आयुष्य फक्त आपल्यासाठी, आपल्या सुखासाठी घालवल त्यांच्यापासून सुटकेचा विचार आपण कसा काय करू शकतो.

  एका बाजूला जेनी, तिचे प्रेम , एक नवीन अर्थपूर्ण , स्वप्नपूर्तीच जीवन आणि एका बाजूला आजोबा , त्यांची जबाबदारी आणि रोजच कटकटीच जीवन या दोन्ही विचारात मिगेल खरच अडकला होता. आता हा मनाचा गुंता त्याला असह्य होत होता . तो हळूच आजोबांच्या खोलीत आला. आजोबा शांत झोपले होते. तो हळूच त्यांच्या बाजूला बसला. आणि त्यांच्या शांत , समाधानी चेहेऱ्याकडे एकदा बघितले.   परत एकदा लहान होऊन आजोबांच्या समोर जाऊन बसावे  आणि रडवेला  चेहरा घेऊन सगळे छोटे मोठे प्रश्न त्यांना सान्गावे आणि आजोबांनी नेहमीप्रमाणे सगळे सोप्पे करून समजावून द्यावे असे वाटले. उद्या सकाळी आजोबांची माफी मागायची  आणि त्यांना सगळे सांगून टाकायचे असे मिगेल ठरवलं . उद्या जेनीला सुद्धा त्याचा तिच्याबरोबर जाण्याचा निर्णय सांगायचं  आणि इथेच आजोबांन  बरोबर राहून जे करता येईल ते करायच त्याने  ठरवले . जेनी , त्याचे बाहेर जाण्याचं स्वप्न हे सगळ विसरणं अवघड होते पण आता निर्णय झाला होता.

  सकाळी नेहमी प्रमाणे  मिगेल उठला आणि आजोबांच्या खोलीत गेला. आजोबा अजून झोपलेलेच होते. खरंतर आत्तापर्यंत ते उठलेले असायचे. त्याने त्यांना जवळ जाऊन हाक मारली पण काहीच हालचाल झाली नाही. जेव्हा त्याने आजोबांचा हात हातात घेतला तेव्हा त्याला जाणवलं कि आजोबा आता या जगात नाहीत. सगळ संपले होते. आता मात्र तो सुन्नच झाला. नेहमीप्रमाणे आजोबांनी शांतपणे त्याच्या मनाचा गुंता सोडवला होता. त्याने काहीच सांगता त्याचा प्रश्न सोडवला होता. आता तो जेनी बरोबर जाऊ शकत होता. त्याचे स्वप्न पूर्ण करू शकणार होता. परत एकदा आजोबांनी मिगेल च्या सुखाचा विचार केला होता पण मिगेल मात्र आता  आयुष्यभर पश्चातापात  जळत राहणार होता.

 

                                                                                                                                    अनघा दातार  

No comments:

Post a Comment